दौंडमध्ये कोरोना रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये : आरोग्यअधिकारी डॉ.रासगे



दौंड : सहकारनामा (अब्बास शेख)

दौंडमध्ये अजूनतरी कोणताही कोरोनाचा रुग्ण सापडला नसून नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी ‛सहकारनामा’च्या माध्यमातून केले आहे.

दौंडमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याची मोठी अफवा सोशल मीडियावर पसरवली जात आहे. या अफवेबाबत डॉ.रासगे यांनी माहिती देताना  एक युवक ज्याच्या हातावर Quarantine चा शिक्का मारलेला होता तो एक्स्प्रेसने सुरक्षितस्थळी (एकांतवासात) जाण्यासाठी प्रवास करत होता परंतु त्याच्या हातावरील शिक्का पाहून अन्य प्रवासी घाबरले आणि त्यांनी दौंड स्थानकावर त्या युवकास गाडीतून खाली उतरवून त्यास दौंड नगरपालिकेच्या अँबुलेन्सने नायडू हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. हा सर्व प्रकार काहींनी व्हिडिओमध्ये चित्रित करून दौंडमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला अशी अफवा पसरवली असून यावर कुणी  विश्वास ठेवू नये असे डॉ.रासगे यांनी सांगत नागरिकांनी कोरोनाबाबत जागरूक राहून सावधानता बाळगावी, गर्दीची ठिकाणे जाऊ नये, हात स्वच्छ धुवावे, हस्तांदोलन टाळावे, मास्क वापरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.