Categories: Previos News

‛कोरोना पॉझिटिव्ह’ डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या ‛दौंडच्या’ त्या महिलेचा अहवाल आला समोर, दुसऱ्या महिलेबाबतही तेच घडले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एका दवाखान्यातील डॉक्टर कोरोना बाधित झाल्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी त्याच दवाखान्यात गेलेल्या दौंडच्या एका महिलेची पुण्यात तपासणी करण्यात आली त्यामध्ये त्या महिलेचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे तर दुसऱ्या प्रकरणामध्ये एका महिलेला सर्दी , खोकला सुरु होता या महिलेला देखील पुणे येथील ससुन रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते त्या महिलेचाही वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे दौंडकरांनी घाबरून जाऊनये अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली. या बाबतची अधिक माहिती अशी की पानवली या गावची एक महिला वैद्यकीय  तपासणीसाठी शिक्रापूर येथे गेली होती. ज्या दवाखान्यामध्ये ही महिला तपासणीसाठी गेली होती त्या दवाखाण्याचे एक डॉक्टर कोरोना संसर्गाने बाधीत झाले होते. त्यामुळे तातडीने या महिलेची पुण्यातील ससून रुग्णालयात तपासणी करण्यात आली त्यामध्ये या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आलेगाव येथील एका महिलेला सर्दी, खोकला असा त्रास होऊ लागला त्यावेळी तिचीही तपासणी केली असता तिचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दौंड तालुक्यात अजूनही कुणी कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही परंतु नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सॅनिटायझर, फेसमास्क, तसेच वारंवार साबणाने हात धुवालत रहावे असे आवाहन डॉ.रासगे यांनी केले.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago