Categories: Previos News

मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, टाळ्यांच्या गजरात निरोप

नाशिक : सहकारनामा ऑनलाईन

शनिवार दि. ०२ मे रोजी उत्तर प्रदेशच्या ८४५ नागरिकांना विशेष रेल्वेने यूपीमधील लखनौ येथे पाठवण्यात आलं. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर  विशेष १६ डबे असणाऱ्या गाडीने हे सर्व नागरिक सोशल डिस्टन्स पाळत आपल्या राज्यात रवाना झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तर नाशिकच्या रहिवाश्यांनी या मजूर लोकांना  टाळ्या वाजवून निरोप दिला.

ट्विट @छगन भुजबळ

 कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले त्यामुळे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह आपले सामान घेऊन पायी मुंबईहून यूपीच्या दिशेने निघाले होते. ते नाशिकमार्गे जात असताना त्यांना पोलिसांनी थांबवले होते या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. यासर्वांना नंतर शेल्टर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करत त्यांना मायदेशी रवाना केले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago