दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगावमध्ये एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले असून त्यामुळे केडगावमधील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी सहकारनामा शी बोलताना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केडगाव स्टेशन येथील हे डॉक्टर रहिवासी असून त्यांना थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी लोणीकाळभोर येथे कोरोनाची टेस्ट करवून घेतली होती. या अहवालामध्ये प्रथम दर्शनी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यामुळे केडगावकारांच्या चिंतेत भर पडली आहे.
याबाबत दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी नागरिकांनी मास्क वापरावे, साबणाने हाथ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.