थेऊर : सहकारनामा ऑनलाइन (बापूराव धुमाळ)
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथे पोहोचण्यासाठी थेऊरफाटा ते थेऊरगाव या रस्त्याची दैनिय अवस्था झाली असून या रस्त्याचे काम गेली दीड वर्षापासून प्रलंबित आहे रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकला प्रवास करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तर खड्यामुळे गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते पाच किलो मीटटर अंतर पार करण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो त्यामुळे या रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरु झाले नाही तर रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष मारुती कांबळे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट तसेच मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे यांनी तिव्र आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.
अष्टविनायक सुविधा प्रकल्प अंतर्गत हायब्रीड प्रकल्पांतर्गत लोणीकंद ते थेऊरफाटा या सतरा कि.मी.रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असून यासाठी युती शासनाच्या काळात रु.161 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला तात्कालिक सार्वजनीक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले परंतु हे काम एवढे रेंगाळत गेले की आजपर्यंत थेऊर ते थेऊरफाटा या रस्त्यावर केवळ देखभाल दुरुस्ती करण्यापलिकडे काहीच करता आले नाही याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो आहे त्यामुळे काही सामाजिक संघटना पुढे येऊन त्यांनी या खात्याला लेखी निवेदन दिले आहे.
यावर सार्वजनीक बांधकाम खात्याचे अभियंता सत्यशिल नागरारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की या रस्त्यावरील काही शेतकरी बांधवांनी रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन देण्यास हरकत घेतली आहे त्यांची समजूत काढून योग्य तो मार्ग काढून येत्या सात दिवसात याचे परिणाम दिसून येतील असे सांगितले.
तर यावर काम करणारे कंत्राटदाराच्या व्यवस्थापक ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी सांगितले की आमची यंत्रणा तयार आहे परंतु आम्हाला काम करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला की ताबडतोब काम चालू होईल यात काही तांत्रिक अडचणी आहे त्या लवकरच दूर होतील व कामाला सुरुवात होईल तरी रस्त्यावरील पावसामुळे पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरुपात मुरुम टाकून भरले आहेत एकवेळ काम चालू झाल्यावर त्यास अग्रक्रमाने पूर्ण करण्यात येईल