लग्न समारंभांमध्ये नियम पाळा अन्यथा होऊ शकते ‛वडगाव मावळ’ सारखी कारवाई



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणावर आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे मात्र हे लॉकडाऊन आता थोडेफार शिथिल करून 50 लोकांच्या अटीवर लग्न समारंभांना परवानगी दिली गेली आहे. मात्र या अटींचे पालन होताना दिसत नाही त्यामुळे पोलिसही लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन नियम पाळले जातात की नाही याची पाहणी करत आहेत. जर नियम पाळले जात नसतील तर आता मंगल कार्यालय मालक आणि वर,वधू पित्यावर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. नुकतेच काल शुक्रवारी वडगाव मावळमध्येही असेच एक प्रकरण घडले असून लग्नासाठी 50 लोकांची परवानगी असताना तेथे 60 ते 70 लोक जमा झाले होते आणि तेथे सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळला जात नव्हता हे ज्यावेळी पोलिसांच्या निदर्शनास आले त्यावेळी पोलिसांनी वधूचे चुलते आणि हॉटेल चालक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता लग्न समारंभांमध्ये नियम न पाळल्यास कारवाई होत आहे त्यामुळे व्यवस्थपकांनी नियम व अटींच्या अधिन राहून लग्नकार्ये पार पाडण्याची गरज आहे.