Categories: Previos News

दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये कॉम्पुटराईज्ड डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध, आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे आता सामान्य रुग्णांना मोठा दिलासा



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कॉम्प्युटराईज्ड डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध झाले आहे. सरकारी दवाखान्यात नवीन आधुनिक एक्स-रे मशीन उपलब्ध झाल्या मूळे सामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्यामध्ये करावा लागणारा खर्च आता पूर्णपणे वाचणार आहे. 

या नवीन एक्स-रे मशीन बाबत डॉक्टर संग्राम डांगे यांनी माहिती देताना सांगितले की, सदरचे मशीन सामान्य रुग्णांसाठी खूपच फायदेशीर व  उपयुक्त ठरणार आहे. ह्या मशीन द्वारे अतिशय उच्च दर्जाचे एक्स-रे रिपोर्ट ऑनलाइन मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांना लागलीच प्राप्त होणार आहे. तज्ञ डॉक्टरांच्या अभ्यासाने आजाराचे अचूक निदान होऊन रुग्णांना योग्य वेळेत योग्य उपचार देण्यासाठी या एक्स-रे मशीनची मोठी मदत मिळणार आहे. 

सामान्य रुग्णांना अशा कामासाठी खाजगी दवाखान्यामध्ये मोठी रक्कम मोजावी लागत आहे हे लक्षात घेऊन आमदार कुल यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सदरचे मशीन उपलब्ध करून दिले आहे. ज्यामुळे सामान्य रुग्णांच्या पैशाची मोठी बचत होऊन त्यांना योग्य उपचार सुद्धा उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहे. याआधी जिल्ह्यातील फक्त बारामती व मंचर या दोनच सरकारी दवाखान्यात असे एक्स-रे मशीन उपलब्ध होते, राहुल कुल यांच्या प्रयत्नामुळे आता दौंड करांना सुद्धा या मशीनचा लाभ मिळणार आहे असेही डॉक्टर डांगे म्हणाले.

शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त सोयी, सुविधा व चांगले उपचार मिळावेत म्हणून आमदार राहुल कुल प्रयत्नशील असतानाच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सहकारी सुद्धा कुल यांना चांगला प्रतिसाद देताना दिसतात. याचेच उदाहरण म्हणजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांना मणक्याचा त्रास सुरू झाला आहे, डॉक्टरांचा मणका सरकल्यामुळे त्यामध्ये पोकळी निर्माण होऊन त्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो आहे, त्यांना 24 तास पूर्ण विश्रांती आवश्यक असल्याचा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

असे असतानाही येथील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचार सेवेत खंड पडू नये म्हणून डॉक्टर स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून 24 तास कामावर रुजू आहेत असे येथील इतर डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर डांगे यांच्या या योगदानाचे दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांनी आभार मानले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

15 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago