Categories: Previos News

किरकोळ वादातून दौंड तालुक्यातील पडवी येथे एकाचा धारदार शस्त्राने ‛खून’

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील पडवी येथे किरकोळ वादातून एकावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.१ जून रोजी सायंकाळी ७ वाजता गायकवाड मळा, पडवी ता.दौंड येथे यातील आरोपी खंडू उर्फ रमेश विष्णू गायकवाड मजकुर याने किरकोळ कारणा वरून यातील मयत पोपट वसंत गायकवाड यास शिवीगाळ दमदाटी करून धारदार चाकुने छातीत वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले. याबाबत यवत पोलिसांनी फिर्यादी सुर्यकांत लक्ष्मण गायकवाड (वय २६ वर्षे व्यावसाय – खाजगी नोकरी रा.गायकवाड मळा पडवी ता,दौंड जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलिसांनी तातडीने आरोपी खंडू उर्फ रमेश गायकवाड यास ताब्यात घेतले असून पो.हवा.भिसे यांनी गुन्हा दाखल करून घेतला असून या घटनेचा तपास पोलीस उप निरिक्षक श्री.घाडगे करत आहेत.  खुनाची माहिती मिळताच दौंड विभागाच्या उपविभागिय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago