दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगावमध्ये कोरोनाचे प्रस्थ वाढत चालले असून काल दोघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आज पुन्हा एकाला कोरोनाची लागण झाली असून कोरोना बाधित हि व्यक्ती केडगावच्या हंडाळवाडी येथील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे एकदिवसाच्या अंतरानेच तीन जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.
केडगाव हि तालुक्यातील नावाजलेली आणि प्रसिद्ध बाजारपेठ असून या ठिकाणी आत्तापर्यंत 13 जन कोरोनाचे शिकार झाले आहेत. यातील अनेकजण बरे होऊन घरीही परतले असून नवीन कोरोना बाधित आढळून येत असल्याने केडगावकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.काही दिवसांपूर्वी उघडी होत असलेली दुकाने आता आपोआपच बंद झालेली दिसत आहेत. नागरिकांनी योग्य काळजी न घेतल्यास याचा आणखीन प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून बाहेर फिरण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासकीय यंत्रनांमार्फत केले जात आहे.