दौंडच्या त्या ‛आठ’ जवानांपुढे कोरोनाने शस्त्रे टाकली



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

सध्या जगात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोना बाधित झालेल्या अनेकांनी जीवनाची लढाई हारली आहे तर अनेकांनी यावर मातही केली आहे. दौंडबाबतही असेच काहीसे घडले असून दौंडच्या राज्य राखीव पोलीस दलातील ११० जवान मुंबई येथून आपली कामगिरी बजावून दौंडला आले होते. मात्र त्यांच्यातील आठ जवान कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट आले होते. या कोरोना बाधित जवानांना पुणे येथे आरोग्य ऊपचार सुरू होते. उपचाराअंती आठ पैकी आठ जवान निगेटीव्ह आले असल्याची माहीती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.वैशाली खान आणि डॉ.नितीन भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे दौंडकरांना मोठा दिलासा मिळाला असून या जवानांच्या कोरोना विरुद्धच्या लढाईचे कौतुक होत आहे.