दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील केडगाव येथे कोरोना सदृश बाळ आढळल्यानंतर त्या बाळाचा सांभाळ करणाऱ्या त्याच्या नातेवाईकांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. याबाबतची अधिकृत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.
अहवालामध्ये आलेल्या निगेटिव्ह रिपोर्टमुळे त्या नातेवाईकांसह केडगाव-बोरीपारधीच्या नागरिकांचाही जीव भांड्यात पडला आहे.
केडगाव-बोरीपारधी येथे एका सोसायटीमध्ये एका बाळाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्या नंतर या बाळाला त्याचे आईवडील त्यांच्या गावी घेऊन गेले मात्र त्या बाळाचा सांभाळ करणारे नातेवाईक कोरोना रडारवर आले होते. त्यामुळे त्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली या टेस्टमध्ये हे सर्व कुटुंब कोरोना निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला