Categories: Previos News

दौंड’ला पडलेला करोना’चा विळखा थोडा सैल, ३९ पैकी फक्त ०१ अहवाल पॉझिटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरात कोरोना महामारीचा मोठा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण ३९ व्यक्तींच्या घशातील स्त्राव शुक्रवारी पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी फक्त एका व्यक्तीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.  या अहवालामुळे दौंडकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. शहरातील व्यापारी, नागरिकांचे सहकार्य व प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसत आहे. शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने इतर संशयितांचे स्त्राव सोमवारी तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. लागोपाठ दोन दिवस शहरात करोना बाधित रुग्ण कमी आढळले आहेत त्यामुळे शहर पुन्हा पूर्वपदावर येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago