Categories: Previos News

रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर, तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी द्या : आ.राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर, तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील  कर्मचाऱ्यांना देखील दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी द्यावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचे कडे केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे सेवा बंद असल्याने कामासाठी दौंड-पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या पुढे मोठा प्रश्न उभा आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर, अत्यावश्यक सेवेतील बँक कर्मचारी, शासकीय, निमशासकीय सेवेतील इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना देखील दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी द्यावी व कामानिमित्त दौंड -पुणे दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी व कोरोना उपाययोजना संदर्भात आज जिल्हाधिकारी मा. नवल किशोर राम साहेब यांची  नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी आ.कुल यांनी चर्चा केली. रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी कामानिमित्त दुचाकीवरून दौंड -पुणे प्रवास करीत कर्तव्य बजावत आहेत पावसाळ्यात त्यांचे हाल होण्याची शक्यता तसेच संभाव्य धोका नाकारता येत नाही त्यामुळे  या कर्मचारी बांधवासाठी एक स्वतंत्र बोगी जोडण्याची मागणी केली असून. याबाबत सोलापूर विभागीय आयुक्त सकारात्मक आहेत तेव्हा पुणे रेल्वे विभागीय आयुक्तांशी याबाबत चर्चा करण्याचे व आपल्या विनंतीनुसार दौंड-पुणे प्रवासी संघाच्या विविध मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. याचबरोबर दौंड शहर व तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक उपाययोजना कराव्यात, विलगीकरणात असणाऱ्या राज्य राखीव पोलीस जवानांसाठी योग्य आवश्यक सुविधां आदी मागण्या तसेच कोरोना संबंधी व्यापक जनजागृती करणे संदर्भात चर्चा यावेळी झाली. प्रसंगी दौंड-पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष मा. प्रेमसुखजी कटारिया, कार्याध्यक्ष मा. गणेश शिंदे, सचिव मा.विकास देशपांडे, मा.अयुब तांबोळी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

4 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

13 तास ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

1 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

2 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

2 दिवस ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

2 दिवस ago