Categories: Previos News

Breaking News : येरवडा कारागृहातून पळालेल्या मोक्यातील आरोपीस दौंडमध्ये अटक



पुणे/दौंड : सहकारनामा ऑनलाईन

येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या पाच आरोपींपैकी एका आरोपीस पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.

गणेश अजिनाथ चव्हाण (वय.२२ वर्षे रा. बोरावके  नगर, दौंड ता. दौड जि. पुणे) असे या आरोपीचे नाव असून त्यास लिंगाळी ता. दौंड येथे सापळा रचून पाठलाग करत पकडण्यात आले आहे. या आरोपीस ताब्यात घेवुन येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांकडे सुपूर्द करण्यात आले.

पुणे शहरात असणाऱ्या येरवडा जेल मधून रात्री खिडकीचे गज कापून पाच कैदी फरार झाले होते. या कैद्यांमध्ये देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो यांचा समावेश होता. यातील तिघे दौंड तालुक्यातील असून यांच्यातील एकास पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.

या आरोपींचा शोध घेण्यासाठी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी IPS ऐश्वर्या शर्मा दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.डी.महाडीक, सहा.फौजदार डी.जी. भाकरे, पो.हवा.आसिफ शेख, पो.ह.पांडुरंग थोरात, पो.ना.अण्णासाहेब देशमुख, पो.ना.सचिन बोराडे, पो.कॉ.अमोल देवकाते, पो.कॉ.राहुल वाघ, पो.कॉ.अमोल गवळी, पो.कॉ.अमजद शेख, पोकॉ अक्षय घोडके, पो.कॉ.किरण राउत, पो.कॉ.शैलेश  हंडाळ, पो.कॉ.अप्पासाहेब करे, होमगार्ड गजानन थोरात, होमगार्ड सौरभ कापरे, पोलीस मित्र सुरज फाळके यांनी  मोठी मदत केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago