Categories: Previos News

लोणीकाळभोर परिसरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी मोहीम सुरू



लोणी काळभोर : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी अनेक विविध  उपाययोजना गावपातळीवर  आखल्या जात आहेत.  जिल्हा परिषद व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व विश्वराज हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने  नागरिकांची मोफत आरोग्य चाचणी घेण्याची मोहीम लोणी काळभोर परिसरात सुरू करण्यात आली आहे.  यासाठी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डी.जे.जाधव, उपसभापती सन्नी मोहन काळभोर,माजी सरपंच भोलेनाथ शेलार, उपसरपंच राजेंद्र काळभोर, आण्णासाहेब काळभोर तसेच विश्वराज हाॅस्पिटलचे कर्मचारी  मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून याची तपासणी करण्यात आली. 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने  संपूर्ण लाॅकडाऊन केल्यावर  ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंध समितीचे गठण केले यामध्ये प्रत्येक वार्डातील सदस्यांचा सहभाग करुन घेतला.प्रत्येक वार्डात दोन मशिनच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. नागरिकांनी घराबाहेर अजिबात पडू नये असे आवाहन ग्रामपंचायत वतीने करण्यात आले आहे. कोरोना या महामारीची भिती सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले आहे. कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका, अंगणवाडी मदतनीस, सामाजिक कार्यकर्ते यांना पंचायत समिती आरोग्य विभागाकडून क्लोरोकिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago