केडगावमध्ये ‛दारू’ दुकानासमोर सोशल डिस्टनसिंगला हरताळ, पोलीस येताच तळीरामांचे झाले असे काही..



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

कोरोनामुळे झालेले लॉकडाउन आणि तळीरामांची झालेली पंचाईत हे सर्वजण जाणत आहेत मात्र हे तळीराम दारूसाठी इतके आसुसले आहेत की आज दौंड तालुक्यातील केडगाव येथे त्यांनी मोठी गर्दी करत अक्षरशः सोशल डिस्टनसिंगला हरताळ फासला.

केडगाव येथील एका दारू दुकानासमोर जवळपास दीडशे-दोनशे तळीराम एक दुसऱ्याला खेटून रांगेत उभे राहत आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत होता.ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नियम मोडणारे तळीराम अक्षरशा सैरावैरा धावू लागले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दुकानदारास दुकान बंद करायला लावून सोशल डिस्टनसिंग पाळले नाही तर हे सर्व बंद करायला लागेल अशी भूमिका घेतली अण सगळेच सुतासारखे सरळ झाले. दुकानदाराने तातडीने दुकानासमोर बॅरिकेट लावले तर १००-१५० पैकी पोलीस आले हे समजताच रफू चक्कर झालेले मात्र कोणत्या बिळात जाऊन लपले ते अजून दिसलेच नाही