पुणे : सहकारनामा ऑनलाईन
दि. 15 मे रोजी लोणीकाळभोर पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग LCB पथक संचारबंदी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरून घोरपडे वस्ती लोणीकाळभोर येथे आरोपी इसम फैजान उर्फ बबलू शकील अन्सारी (वय 22 वर्षे रा.घोरपडे वस्ती लोणीकाळभोर) हा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल, 3 जिवंत काडतुसे, पितळी मूठ असलेली लोखंडी तलवार व लाकडी मूठ असलेला धारदार लोंखंडी कोयता अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी हडपसर, लोणीकाळभोर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सफौ.दत्तात्रय जगताप, पोहवा रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, पोना विजय कांचन, पोशी धीरज जाधव, अक्षय जावळे यांनी केली.