दारू विक्री थांबविण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नकार, मात्र..



: सहकारनामा ऑनलाईन

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन केले गेले मात्र त्याचा परिणाम येणाऱ्या  महसुलावर जाणवू लागल्याने केंद्र सरकारकडून दारू विक्रीला परवानगी दिली गेली. मात्र सुरू झालेली दारूविक्री थांबवावी यासाठी याचिका  दाखल करण्यात आली. मात्र आता या याचिकेवर निर्णय देताना दारूविक्री थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

याबाबत हिंदी वृत्तवाहिनी आजतक ने वृत्त दिले असून या वृत्तानुसार दारूविक्रीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये सोशल डिस्टनसिंग पाळले जात नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अश्या आशयाची मागणी या करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौल म्हणाले की हा विषय राज्यांतर्गत सूचीत येतो. त्यामुळे त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देता येणार नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं हे प्राधान्याने पाहणं गरजेचं आहे. सध्या अनेक राज्य सरकार होम डिलिव्हरीच्या मार्गाने दारू विक्रीचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी हा विचार अंमलात आणण्याविषयी पावलं उचलावीत. जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगही साध्य होईल आणि महसुलाच्या दृष्टीने विक्रीही सुरू राहील असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने दारू विक्री थांबवण्यावर नकार दिला आहे.