अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गळफास घेऊन आत्महत्या



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

अल्पावधीत आपले नाव बॉलिवूडवर कोरणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईत असणाऱ्या आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे 

बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असून आत्महत्येचे कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही. सुशांतसिंह 34 वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. 2013 मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.