आठवड्यातील ‛हे’ चार दिवस गाव राहणार बंद, आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना विषाणू ‘ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन समिती, केडगांव. ता.दौंड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार दि. १३ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीसाठी खालील निर्णय घेण्यात आले. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वानी हात धुणेसाठी सॅनिटायजर युक्त पाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे, दोन व्यक्तीमधील अंतर कमीत कमी १ ते १.५ मिटर ठेवून व त्यांची रांग  ठेवण्याची सर्व जबाबदारी संबधित दुकानदाराची राहील, सेवा देणाऱ्याने हातमोजे घालूनच सामान देणे व येणाऱ्या ग्राहकांना नाव, मोबाईल नंबर यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवणे. संबधित रजिस्टर तपासणीसाठी आलेल्या शासकीय प्रतिनिधीना उपलब्ध करून  देणे. किराणा दुकान सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत दुकान चालू राहतील (जनता कर्फ्यु सोडून). मंगळवार, गुरुवार, शनिवार



व रविवारी गाव (जनता कर्फ्यु) पूर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल,मेडिकल,दुध व पाणी विक्री व पेट्रोल पंप (फक्त अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी) याच सेवा चालू राहतील. भाजीपाला व फळविक्री दुकानदारांनी व शेतकऱ्यांनी घरोघरी जाऊन वाटप करावे. रेशनिंग दुकान सकाळी ९ ते १२ या वेळेतच चालू राहील. दुध वाटप घरोघरी सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ६ ते ८ या वेळेतच चालू राहील. जार पाणी वाटप घरोघरी सकाळी ६ ते ११ व संध्याकाळी ६ ते ८ या वेळेतच चालू राहील. दुध संकलन सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ६ ते ९ या वेळेतच चालु राहील तसेच पशुखाद्य विक्री सकाळी ९ ते १२ वेळेतच चालू राहील. मेडिकल,दवाखाना संपूर्ण दिवस चालू राहतील. खते, शेती औषधे यांची दुकाने सकाळी ९ ते १२ वेळेतच चालू राहतील वरील नमूद केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्वाना स्वताची आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक राहील तसेच कोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे आढळून आलेस त्यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करू नये व वैद्यकीय सल्यानुसार पुढील आवश्यक ते उपचार घ्यावेत.

सदर कालावधीत बंद मोडणाऱ्या नागरिकांवर कलम १४४ जमावबंदी व कलम १८८ संचारबंदी

अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच नियम मोडल्यावर होणाऱ्या कार्यवाहीस तो व्यक्ती स्व:ता जबाबदार राहील अशी माहिती यावेळी व्यवस्थापन समितीच्यावतीने देण्यात आली. यावेळी केडगाव पोलीस ठाण्याचे पोह जितेंद्र पानसरे,  सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि पोलीस पाटील हे उपस्थित होते.