इंदापूर पुन्हा कोरोनाच्या रडारवर !नव्याने कोरोना रुग्ण सापडल्याने चिंता वाढल्या



इंदापूर : सहकारनामा ऑनलाईन

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. इंदापूर शहरात असणाऱ्या जुनी रयतशाळा परीसरात कोरोनाचे नवीन प्रकरण समोर आले असुन इंदापूर तालुक्यात आता कोरोना इफेक्ट झालेल्यांची संख्या सात झाली आहे. इंदापूर शहरातील हे दुसरे कोरोना बाधित प्रकरण आहे. याबाबतची अधिकृत माहिती इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली आहे.

इंदापूर तालुक्यात या अगोदर पाच कोरोना बाधित रूग्ण होते. पाच पैकी एकाचा मृत्यू झाला होता तर चार रूग्ण उपचारानंतर निगेटिव्ह होउन घरी परतले होते. मात्र पुन्हा नव्याने कोरोना बाधित रुग्ण समोर येत असल्याने इंदापूरकरांच्या चिंता वाढल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.