Categories: Previos News

सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचा अता तायीपणा… कोरोना बाधितांची माहिती लीक होत असल्याची भीती



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यामध्ये सध्या काही अती उत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

हा धुमाकूळ कोरोना बाबत असून त्यामुळे यातील गंभीरता वाढत चालली आहे. वास्तविक पाहता किरोनाबाबतची माहिती संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार, मीडिया हाऊसला कळवली जाते. या माहितीच्या आधारे वृत्तपत्र, त्या वृत्तपत्रांचे डेली अपडेट देणारे न्यूज पोर्टल, वृत्तवाहिनी हे कायद्याच्या चौकटीत राहून आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची आयडेंटि लीक होणार नाही याची काळजी घेऊन ते वृत्त प्रसारित करीत असतात मात्र सध्या सोशल मीडियावर एक नवीनच फंडा पहायला मिळत असून ज्या गावामध्ये कुणी कोरोना रुग्ण आढळला की वृत्तपत्र, त्या वृत्तपत्राचे न्यूज पोर्टल आणि वृत्तवाहिणीच्या अगोदर सोशल मीडियावर फेसबुक, व्हाट्सअप, व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून ‛आज 3 कोरोना बाधित सापडले’, 5 सापडले असे मेसेज टाकून त्यांचे मेसेज पाहून त्यांना सर्वसामान्यांनी फोन केला तर ते थेट त्यांची माहितीही समोरील व्यक्तींना सांगत असल्याचे अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देत आहेत, हाच प्रकार अनेकांच्या बोलण्यातूनही समोर येत आहे. त्यामुळे हे सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे लोक नेमकी माहिती कुठून मिळवतात आणि यांना कोरोना बाधित व्यक्तीच्या स्वतः पोस्ट टाईप करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचा आणि त्यांची आयडेंटिटी लोकांसमोर जाहीर करण्याचा अधिकार दिला कुणी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यकर्त्यांच्या या अता ताईपणामुळे मात्र अनेक कुटुंबे वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर विशेष वाटायला नको.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago