खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांकडून अटक



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

– हॉटेलच्या वादावरून रस्त्यात अडवून लोखंडी रॉड कुर्‍हाड व बांबूच्या काठीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस यवत पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विक्रम बबन चौगुले (वय वर्षे २६ धंदा चायनीज हॉटेल राहणार नांदूर साई कृपा बिल्डिंग तालुका दौंड) यांना दि.६ मार्च रोजी रात्री ११:३० वाचे. सुमारास नांदूर गावच्या हद्दीतील महालक्ष्मी मोबाईल शॉपी समोरील नांदूर रोडवर आरोपी  भरत अनिल शिंदे (वय २२ वर्षे राहणार खामगाव तालुका दौंड) व त्याच्या इतर तीन साथीदारांनी हॉटेल वादाच्या कारणावरून रस्त्यात अडवून लोखंडी रॉड, कुर्‍हाड व बांबूच्या काठीने फिर्यादीच्या डोके, तोंड तसेच हाता,पायावर मारहान करून गंभीर जखमी केले होते.

सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते. त्याबाबत यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आरोपीचा शोध घेणेबाबत सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस नाईक दशरथ बनसोडे व पोलीस नाईक संतोष पंडित यांचे एक खास पथक तयार करून आरोपीस अटक करण्याबाबत सूचना केल्या होत्या. सदरचा आरोपी हा उरुळी कांचन तालुका हवेली परिसरात येणार असल्याची माहिती या पथकास मिळाल्यानंतर उरुळीकांचन येथे असणाऱ्या पीएमटी बसस्टॉप जवळ सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचेअप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास स.पो.निधनजंय कापरे करीत आहेत.