येणाऱ्या दोन महिन्यांत जास्त काळजी घेण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी वाढत असल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्राणावर होणार असलेला प्रादुर्भाव रोखण्यात यश आले मात्र येणाऱ्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून या दोन महिन्यांमध्ये याचा जास्त प्रमाणावर फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत WHO ने सुद्धा इशारा दिला आहे. 

विदेशामध्ये आटोक्यात आलेल्या ठिकाणांवर पुन्हा कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊनबाबत  निर्णय घेताना याबाबी तपासल्या जाऊन मगच योग्य निर्णय घ्यावा लागेल या इशारा देत जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सोमवारी देशाचे पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी बातचीत केलि त्यावेळी लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की देशभरात मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र मजूर विविध झोन्समधून प्रवास करीत असल्याने प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रादर्भाव वाढू शकतो यावर लक्ष वेधले.