मोकाट जनावरांमुळे थेऊरकर बेजार



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

थेऊर येथील ग्रामस्थांना गावात मोठ्या प्रमाणावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा खुप त्रास सहन कारावा लागत असून यातील अनेक जनावरे तर घरासमोर उभारलेल्या शेडमध्ये रात्री घाण करुन ठेवत असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

आपल्या देशात प्राणी मात्रावर दया करण्याविषयी अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे प्राण्यांची पुजाही केली जाते परंतु थेऊर गावात गेल्या काही महिन्यापासून मोकाट जनावरांची मोकाट संख्या खुप वाढली आहे. यात अनेकांनी मालकीची जनावरे  मोकळी सोडली आहेत तर बरीच जनावरे ही येथे असणाऱ्या गो शाळेतील आहेत. या जनावरांमुळे अनेक स्थानिक नागरिकांच्या पार्किंग मध्ये घाण होत आहे. अनेकांच्या  गोठ्यावर अपरात्री ही टोळी आपला मोर्चा वळवते त्यामुळे रात्री जागरण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यावर काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे या विषयी तक्रार केली आहे परंतु यावर केवळ कारवाई करु इतकेच उत्तर मिळत आहे परंतु आजपर्यंत काहीच पावले उचलली गेली नाही. मागील वर्षी या विषयावर ग्रामसभेत विषय चर्चेत आलेला होता. त्यावेळी मोकाट जनावरांवर कारवाई करुन पांजरपोळमध्ये रवाणगी  करण्यात येईल असे ठरले होते. परंतु यावर कारवाई झाली नाही.