Categories: Previos News

हॉटेल, लॉज, रिसॉर्ट सुरू होणार! मात्र असे असतील नियम



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

 राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर लॉकडाउन घोषित करताना सर्व हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट बंद करण्यात आले होते. लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही हॉटेल्स, रिसॉर्ट, लॉज सुरू करण्यास परवानगी दिली गेली नव्हती मात्र आता राज्य सरकारने हि अट फक्त कंटेन्मेंट झोन साठी ठेऊन इतर भागातील निवास व्यवस्था असणारे हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट, होम-स्टे आणि  बेड अँड ब्रेकफास्ट सुविधा असणारे हॉटेल सुरू करण्याबाबत सरकारच्या पर्यटन संचालनालयाने नियमावली जाहीर केली आहे. सरकारने हा निर्णय ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत घेतला आहे.

तसेच राज्य सरकरने निवासी सुविधा असणाऱ्या हॉटेल, लॉज, रिसॉर्ट व इतर बाबींना शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती दिली आहे. मात्र याचवेळी नियमावली जाहीर केली असून हि नियमावली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरजेची असल्याच्यासूचना दिल्या आहेत. या नियमावली नुसार लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट्सनी सर्व प्रवाशांची येण्याच्या ठिकाणी थर्मल गनमार्फत तपासणी करणे अनिवार्य केले असून ज्यांना लक्षणे दिसणार नाहीत त्याच पर्यटक, प्रवाशांना प्रवेश देण्याची ताकीद दिली आहे.

याचा वेळी अशा ठिकाणी असणाऱ्या वेटिंग रूम, लॉन्स, बाहेरील जागा अशा ठिकाणी सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी प्रवाशाची माहिती प्रशासन, आरोग्य यंत्रणेला देण्याबरोबर यात प्रवाशाचीही ना हरकत घेणे अनिवार्य असेल.

● अशी असेल नियमावली..

पर्यटक, ग्राहक ज्यावेळी हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये येतील त्यावेळी त्यांनी काय करावे आणि काय करू नये या बाबत असणारी माहिती पुस्तिका, बुकलेट किंवा व्हिडीओच्या माध्यमातून द्यावी. यावेळी पर्यटकांनी आणलेले सामना त्यांनी त्याची वाहतूक स्वतः करावी.

येथे आणण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता केली जावी( प्रामुख्याने रिसॉर्ट, हॉटेलची असणारी वाहने)

पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाइन भरून घ्यावा व शक्य असल्यास क्युआर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इनसारख्या बाबी सुरू कराव्यात.

एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करावा.

रुम सर्व्हिस संपर्कविरहित असावी. मागवलेली ऑर्डर रूमबाहेर ठेवावी.

लहान मुलांसाठीचे प्ले एरिया बंद ठेवावे.

एकूण अशा प्रकारची नियमावली देण्यात आली असून याचे तंतोतंत पालन अनिवार्य असेल.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago