Categories: Previos News

आज चौफुला येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बळीराजा सन्मान ट्रॅक्टर पुजन व भव्य रॅलीचे आयोजन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षामध्ये देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येणा – या  भविष्याचा वेद घेऊन अत्यंत महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले आहेत. यामध्ये गोरगरिब , आदिवासी , मागासवर्गीय , महिला , सैनिक , शेतकरी , युवक , व्यापारी , व्यावसायिक अशा सर्व घटकांना केंद्रस्थानी धरून विकासाची गंगा थेट समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्याचा भागीरथ प्रयत्न मोदी करताना दिसत आहेत.

सध्या बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे, त्यामुळे ट्रॅक्टरचे पुजन गावो गावी करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतल्याने भाजपच्या वतीने बळीराजा सन्मान , ट्रॅक्टर पुजन व भव्य रॅलीचे आयोजन आज सोमवार 12 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12:15 मि.वाजता वरवंड ते केडगाव चौफुला दरम्यान रॅलीचे आयोजन केलेले आहे व समारोप चौफुला येथे होणार आहे . 

यासाठी मा.चंद्रकांतदादा पाटील ( भाजपा प्रदेश अध्यक्ष ) , डॉ.अनिल बोंडे ( भाजपा प्रदेश अध्यक्ष , किसान मोर्चा ), दौंडचे आमदार राहुल कुल, आ.सुजितसिंह ठाकुर, गणेश भेगडे, मा.आ.हर्षवर्धन पाटील , मकरंद कोरडे , सुधीर दिवे , आनंदराव राऊत , धर्मेंद्र खांडरे हे उपस्थितीत राहणार आहेत.

तरी सर्व शेतकऱ्यांनी या कृषी विधयेकाचे समर्थनार्थ आपल्या ट्रॅक्टरसह उपस्थित रहावे असे आवाहन वासुदेव काळे , भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश  आणि माऊली आण्णा ताकवणे अध्यक्ष दौंड भाजप यांनी केले आहे .

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

8 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago