Categories: Previos News

लॉकडाऊन काळातही भाईगिरी थांबेना, कमरेला पिस्तुल लावून परिसरात दहशत करणारे दोघेजण जेरबंद

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे कमरेला पिस्तुल लावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी या स्वयंघोषित भाईंकडून एक गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे जप्त करत फिरोज महंमद शेख (वय२५ रा.घोरपडेवस्ती) आनंद महादेव चव्हाण (वय २३रा.पठारेवस्ती,कदमवाकवस्ती आणि निलेश नागेश जेटीथोर (वय २२ रा.कदमवस्ती) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस गस्त करत असताना त्यांना आरोपींचा संशय आल्याने त्यांची झडती घेतली असता त्यातील फिरोज महंमद शेख याच्या कंबरेस आतील बाजुस लावलेला एक गावठी पिस्तुल आणि मॅगझीनमध्ये ५ जिवंत काडतुसे मिळून आली. सोबत असणाऱ्या आनंद महादेव चव्हाण याकडे ३ जिवंत काडतुसे मिळून आली. ही शस्त्रे त्यांना निलेश नागेश जेटीथोर याकडून मिळाल्याची माहिती फिरोज शेख व आनंद चव्हाण यांनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून यांच्याकडून पिस्तुल, मॅगझीन, गोळ्या असा २८ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पो.ना.परशराम सांगळे व लोकेश राऊत यांनी केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago