Categories: Previos News

पुण्यात पप्पू पडवळचा गेम, घरात घुसून कोयत्याने सपासप वार

पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुण्यात काही दिवसांपासून खुनाच्या घटना घडत असून या खुणांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेईना. पोलिसांवर कोरोना ड्युटीचा असलेला ताण लक्षात घेता या घटना रोखण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे राहिले आहे. कोंढवा येथे गुन्हेगारी पार्श्वभूमी आलेला सराईत गुन्हेगाराचा राहत्या घरात घुसून गेम करण्यात आल्याची घटना आज घडली आहे. हा खून घरात घुसून कोयत्याने वार करून करण्यात आल्याचे समोर येत आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. खून झालेल्या इसमाचे नाव पप्पू पडवळ असे असून तो कोंढवा येथे राहत होता. या खून प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू पडवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर या अगोदरही एका टोळीकडून हल्ला झाला होता. त्याचा व्याजाने पैसे देण्याचा धंदा असल्याचे समोर येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago