अंगणवाडीत शिकणारा चिमुकला ‛श्लोक गायनात’ आला जिल्ह्यात प्रथम



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)  

लहान बालकांवर संस्कार बालपणी आपल्या आईवडीलांकडून होत असतात प्रत्येक पालक आपल्या बाळाला योग्य शिकवण देतो. तसेच हे संस्काराचे पैलू घरातून बाहेर पडल्यानंतर शाळेतील पहिल्या दिवसापासून पडण्यास सुरुवात होते. सध्या इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढला आहे. परंतु अंगणवाडीतील शिकणार्या मुलांची संख्या सुध्दा चांगली असते. या अंगणवाडीत मुल्य शिक्षणासोबत पोषक आहार दिला जातो. थेऊर येथील तारमळा अंगणवाडीमधील लतिकेश बजरंग पवार हा चिमुकला ऑनलाईन श्लोक गायनात जिल्ह्यात पहिला आला असून त्याने राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 

तारमळा अंगणवाडीत पंचवीस मुले आहेत यांना अंगणवाडी सेविका शोभा सरोदे शिक्षणाचे धडे देतात. येथील मुलांना मराठी मुळाक्षरा बरोबर इंग्रजी मुळाक्षरे व अंक यांची पूर्ण ओळख झाली आहे. तसेच दररोज नित्य प्रार्थना श्लोक याचे पठण घेतले जाते.