Categories: Previos News

दौंड रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचा मुद्देमाल चोरणारा आरोपी जेरबंद



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन

परप्रांतीय रेल्वे प्रवाशाचा मुद्देमाल चोरणाऱ्या संशयित आरोपीला दौंड लोहमार्ग पोलीसांनी अटक केली आहे. आमरेश अनमावा चलवादी (वय १९ रा. कमलधिनी, सध्या रा. फिरस्ता दौंड) असे  या आरोपीचे नाव आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बालक गौतम (रा.बारवकरवस्ती वरवंड ता.दौंड, जि.पुणे) यांस मुळगावी रेल्वेने उत्तरप्रदेशला जायचे होते. त्यामुळे तो दौंड रेल्वे स्थानकात आला होता. त्यास झोप लागल्याने तो स्थानकात झोपला होता.

यादरम्यान त्याच्या खिशातील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून फरार झाला होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपीचा शोध घेतला असता. तो दौंडमध्ये सापडला.यावेळी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 

दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे, आनंद वाघमारे, मनोज साळवे, हवालदार ताराचंद सुडगे, अरूण टिंगरे, प्रशांत नेवारे, रेल्वे सुरक्षा बलाचे तेजप्रकाश पाल, सुनिल यादव, प्रदीप गोयकर, अनिल केदार अनिल धोटे, यांनी आरोपीला अटक केली.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago