पुण्यात जहांगीर हॉस्पिटलचा स्टाफ उतरला रस्त्यावर, जहांगीर हॉस्पिटल प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणेशहरामध्ये अतिशय नावाजलेल्या हॉस्पिटल पैकी जहांगीर हॉस्पिटलचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र आज याच हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे.

हा स्टाफ रस्त्यावर उतरण्याचे कारण म्हणजे जहांगीर हॉस्पिटलचे प्रशासन अन्याय करत असल्याचा आरोप या नर्सिंग स्टाफकडून करण्यात येत आहे.

या आंदोलनात सुमारे 300 च्या आसपास कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कोविड आणि नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असलेले पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल व्यवस्थापन नर्सिंग स्टाफसोबत अन्यायकारक वर्तन करत आहे, असा आरोप करत नर्सिंग स्टाफ जहांगीर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरला आहे. सुमारे 300 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

नर्सिंग स्टाफच्या म्हणण्यानुसार त्यांना पगार कमी देणे, कुलिंग टाईम न देणे, 12 तासांची ड्यूटी लावणे, काम करण्याची सक्ती करणे असे अन्यायकारक वर्तन हॉस्पिटल व्यवस्थापन त्यांच्यासोबत  करत आहे.

विशेष म्हणजे काही जणांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांचा राजीनामा देखील स्वीकारला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत अजून जहांगीर हॉस्पिटलकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र प्रतिक्रिया येताच तीही त्वरित प्रसिद्ध करणार आहोत.