Categories: Previos News

फलटण येथील ‛त्या’ अपहृत बालकाचा मृतदेह सापडला, तालुक्यात मोठी खळबळ



पुणे : सहकारनामा ऑनलाइन 

फलटण तालुक्यातील काळज येथून अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह आज सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

ओंकार त्रिंबक भगत या आठ महिन्याच्या बाळाचे त्याच्या घरातून अपहरण झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. 

20 ते 22 वर्षाच्या एक पुरुष आणि एका महिलेने ओंकार ला घरातून उचलून नेल्याची तक्रार करण्यात आली होती. इतर लहान मुलींनी आरडा ओरडा केल्यानंतर नागरिक जमा होईपर्यंत अपहरण कर्ते फरार झाले होते. लोणंद पोलीस या घटनेचा आहोरात्र तपास करत होते. शेवटी ओंकारचा मृतदेह हा जवळ असणाऱ्या एका विहरीत सापडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

या बालकाच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम हाती घेतली होती.

सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासचक्रे फिरवली होती. 

यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात येऊन तपास केला जात होता. 

श्वानाने जवळ असणाऱ्या विहिरीपर्यंत माग काढला आणि विहिरीत अपहरण झालेल्या ओंकारचा मृतदेह सापडला. या घटनेत कोण सामील आहे आणि त्याने हे कृत्य का केले आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

23 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago