Categories: Previos News

खून करून मृतदेह टाकला होता कॅनॉलमध्ये.. मात्र! हडपसर पोलिसांनी गूढ खुनाचा लावला ‛असा’ छडा



पुणे : सहकारनामा (अब्बास शेख)

खून करून कॅनॉलमध्ये टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून झाला आहे हे जाणून त्याच्या संशयित खुन्यांना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. हडपसर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक १५/०३/२०२१ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिंदेवस्ती, हडपसर (पुणे) येथे कॅनॉलच्या वाहत्या पाण्यामध्ये एका इसमाचा मृतदेह वाहत आल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली आणि लागलीच पोलिसांनी घटनास्थळी जावून त्या ठिकाणाची पाहणी केली त्यावेळी त्या मृतदेहाजवळ मिळून आलेल्या साहित्यावरून सदर मृतदेह हा राहुल श्रीकृष्ण नेने (वय ४५ वर्षे रा. नागनाथ पार्क, सदाशिव पेठ पुणे) याची असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु त्या मृतदेहाच्या  चेहऱ्यावरिल जखमा आणि त्यातून आलेले रक्त यावरून पोलिसांना घातपाताचा संशय आला होता.

त्यामुळे पोलिसांनी लागलीच सदची बॉडी ही ससुन हॉस्पीटल येथे पाठूवन पोस्ट मॉर्टम केले त्यावेळी पोलिसांचा संशय खरा ठरला कारण, मयत इसमाचा मृत्यू हा धारधार शस्त्राने गंभिर जखमा केल्याने झाला असल्याचे अहवाल नमूद करण्यात आले होते. हा अहवाल प्राप्त होताच हडपसर पोलीस ठाण्यात भादंविक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे, मयत बॉडी ही कॅनॉलने वाहत आली असल्याने व

कॅनॉलला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मयत बॉडी ही जास्तीत जास्त एक दिवसापूर्वीची असल्याची शक्यता गृहीत धरून तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी शिंदेवस्ती हडपसर पासून ते जनता वसाहत, पर्वती पायथा, पानमळा, गणेशमळा परिसरातील कॅनॉल लगत राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस केली त्यावेळी त्यांनी वरिल वर्णनाची बॉडी वाहत गेली असल्याची माहिती दिली.

त्यानंतर हडपसर तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांची तिन पथके तयार करून त्या परिसरातील सुमारे २५० पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी आणि  तांत्रिक विश्लेषणाचा  आधार घेत तपास केला. त्यामुळे पोलिसांना मयत इसम हा दिनांक १२/०३/२०२१ रोजी धायरी, सिंहगड भागात राहत असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर त्याभागात जावून मयत इसम राहत असलेल्या भागातील सी.सी.टी.व्ही फुटेज पाहत असताना, मयत इसम हा दिनांक

१३/०३/२०२१ रोजी रात्री नंतर परत घरी आला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी धायरी सिंहगड रोड, संतोष हॉल, राजाराम पुल, दांडेकर पुल, या रस्त्यावरिल सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करीत असताना, तपास पथकातील टिमला यातील मयत इसमास काहीजण एका डिओ मोपेड गाडीवर मध्ये बसवून घेवून जात असताना मिळून आले. 

त्याबाबत सखोल पुढील पाहणी केली असता. सदर इसमांनी त्यास दांडेकर पुला नजिक असलेल्या निर्मीती बिल्डींगचे गाळ्यामध्ये असलेल्या एस.बी.आय चे एटीएम मध्ये नेवून मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेवून पुन्हा मारहाण करीत गाडीवर बसवून घेवून गेले. 

त्यानंतर पुढील तपासा दरम्यान प्राप्त फुटेज वरून तपास केला असता, सदर फुटेज मधिल इसम हा रेकॉर्डवरिल आरोपी सतीश संजय सुतार (रा.नर्हे, सिंहगड पुणे व त्याचा साथीदार मिलींद सोनबा पवळे रा. धायरी फाटा) असे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवून घडले घटनेबाबत माहीती घेतली असता, त्या दोघांनी मयताकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतलेले होते व त्यास जिवंत ठेवले तर तो आपली ओळख पोलीसांना सांगेल या भितीपोटी त्यांनी त्या इसमास पर्वती येथिल

शंकर मंदिरा लगत असलेल्या कॅनॉल जवळ घेवून जावून त्याचे डोक्यात दगड घालून त्यास गंभिर जखमी अवस्थेत कॅनॉलमध्ये टाकून त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी ही नामदेव चव्हाण (अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे) व  पंकज देशमुख,( पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ४ पुणे शहर) यांचे मागदर्शनाखाली कल्याणराव विधाते (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे) बाळकृष्ण कदम (वरिष्ठ पोलीस

निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर) पोनि.(गुन्हे) राजु अडागळे, पोनि. (गुन्हे) दिगंबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, सैदोबा भोजराव, अविनाश गोसावी, संदिप राठोड, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, अकबर शेख, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, सचिन जाधव, शाहीद शेख, समीर पांडुळे, निखील पवार यांच्या पथकाने केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago