Categories: Previos News

आरोग्य स्पेशल – शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय



: सहकारनामा ऑनलाईन

मानवाच्या बदलत्या जीवन शैलीमुळे आणि फास्टफूड संस्कृतीमुळे त्याची शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यातच आता वातावरणात होणारे बदल आणि वाढते प्रदूषण यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. एकदा का शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की मग वेगवेगळ्या गंभीर आजारांनी तुम्ही वेढले गेलाच म्हणून समजा त्यामुळे स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या संक्रमित आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खालील सोपे उपाय निश्चितच लाभदायी ठरतात

■ दही – दह्याचे नियमित सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जेवणात दह्याचा समावेश विविध आजारांपासून दूर ठेवते.

■ कच्चा लसूण – कच्चा लसूण हे खूप गुणकारी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोठी मदत होते.कच्च्या लसणामध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात त्यामुळे ते लाभदायी ठरते.

■ हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी मोसमी फळे, दूध यांचा आहारात नियमित समावेश रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासही मदत करते 

■ ग्रीन टी आणि ब्लॅक टी – या दोन्हींच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र याचे अति सेवन करू नये तर केवळ दिवसातून दोन कप सेवन करावे. जास्त प्रमाणात यांचं सेवन केल्यास नुकसानच होऊ शकतं.

■ ओट्स – ओट्समध्ये अॅटी-मायक्राबिअल गुण असतात तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. यामुळे याचे दररोजचे सेवन करणे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.

■ व्हिटॅमिन सी – संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी चं सेवन करणं खूप फायदेशीर ठरते यामध्ये लिंबू, आवळा, संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेली फळं खावीत.

■ व्हिटॅमिन डी – व्हिटॅमिन डी मुळे वेगवेगळ्या रोगांशी लढण्यास ताकद मिळते. हाडे मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात. 

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago