दौंड’च्या पब्लिक स्कुल आवारामध्ये बिबट्याची एन्ट्री ! नागरिकांमध्ये घबराट



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड -कुरकुंभ मार्गावरील राज्य  राखीव पोलीस बल गट क्र. सात मधील पब्लिक स्कूलच्या आवारामध्ये रात्री 10 च्या दरम्यान बिबट्या फिरताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील लोकांनी घराची दारे खिडक्या व्यवस्थित बंद ठेवून सतर्क राहण्याची सूचना SRPF च्या वतीने करण्यात आली आहे. 

येथील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी SRPF जवानांच्या मदतीने बिबट्याचा शोध घेत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.