आ.सुहास कांदे यांच्या वक्तव्या विरोधात दौंडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे आंदोलन



दौंड : नांदगाव (नाशिक) चे आमदार सुहास कांदे यांनी रिपाई पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) गटाने दौंड शहरात आंदोलन केले आहे.

आ.कांदे यांनी केलेले विधानहर आक्षेपार्ह असून त्यांची राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करत असल्या प्रकरणी दौंड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. 

येथील डॉ. बाबासो आंबेडकर चौकामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ.सुहास कांदे यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी पक्षाच्यावतीने पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. रिपाई पक्षाचे युवा नेते अक्षय निकाळजे यांना धमकावण्यात येत असून त्यांचीच बदनामी केली जात आहे त्यामुळे आ. कांदे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 

पक्षाच्या नेत्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात यापुढेही तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी पक्षाचे ता.अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला.

पक्षाचे पदाधिकारी प्रवीण धर्माधिकारी, ईश्वर सांगळे, अभय भोसले, रामभाऊ देवडे, फिरोज तांबोळी, प्रवीण गुप्ते, सनी गायकवाड, गौतम सोनवणे, सुमित कांबळे तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.