दौंड : सहकारनामा ऑनलाइन
रिपब्लिक भारत चे संपादक अर्णब गोस्वामी यांना एका आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आणि राज्यासह दौंडमध्येही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
भाजपने अर्णब गोस्वामीच्या अटकेचा निषेध केला तर राष्ट्रवादीने अर्णब गोस्वामीच्या अटकेवरून समाधान व्यक्त करत अर्णबचा निषेध केला आहे.
याबाबत भाजपने दौंड तहसीलमध्ये जाऊन
रिपब्लीक भारतचे संपादक अर्नब गोस्वामी यांना सुडबुध्दीने अन्यायकारक प्रवृत्तिने मारहान करून केलेली अटक हि सत्य पत्रकारीता करणाऱ्यावर राज्य सरकारने केलेली कुरघोडी आहे. सरकारच्या या आघोरी कृत्याचा आज भारतिय जनता पार्टीच्या वतिने निषेध करतो असे निवेदन तहसीलदारांना दिले.
यावेळी दौंंड तालुका भारतिय जनता पार्टीचे अध्यक्ष मा.माऊली अण्णा ताकवणे पुणे, जिल्हा भारतिय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणिस माऊली शेळके, ग्रामविकास आघाडी सहसंघटक गणेश आखाडे यांसह बहूसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : यवत पोलिसांचा वाळू माफियांना दणका, 1 कोटी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
तर राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णबच्या अटकेवर समाधान व्यक्त करत त्याचा निषेध करताना, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेला काळिमा फासण्याचे काम करणारे रिपब्लिक न्यूज चॅनलच्या प्रमुख अर्णव गोस्वामी यांचा निषेध करतो असे सांगत आज दि.05 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी, कांग्रेसपार्टी, शिवसेना यांच्यावतीने दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब यांना निवेदन देऊन अर्णव गोस्वामी यांचा निषेध करण्यात आला व तसेच मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ करण्यात आले व तसेच पिडीत कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या नगरसेविका उपस्थित होत्या. त्यामध्ये सौ. प्रणोती चलवादी, सौ.अनिता दळवी, सौ.रिझवाना पानसरे, सौ.संध्या डावकर हे उपस्थित होते.