– सहकारनामा
पुणे:
काल झालेल्या प्रशासकीय बैठकीत अंशतः लॉकडाउन चा निर्णय झाल्यानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश काढण्यात आल्यानंतर त्यामध्ये पुण्यातील PMPL ‘पीएमपीएल’ सेवा बंद करण्यात आली त्यामुळे भाजप आक्रमक झाली असून भाजपकडून आज अंशतः लॉकडाउन च्या पहिल्याच दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसह पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनाही ताब्यात घेतले आहे.
शहरात संचारबंदी आणि पीएमपीएल वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याच्या निर्णयावर भाजपने तीव्र विरोध केला आहे.हा विरोध दर्शविण्यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांसह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वारगेट येथील PMPL च्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे.
या आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी व pmpl च्या अधिकाऱ्यांनी खा.गिरीश बापट आणि मुळीक यांची भेट घेऊन त्यांना जमावबंदीमुळे आंदोलन संपवण्याची विनंती केली.
मात्र भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा आदेश न मानता आपले आंदोलन सुरूच ठेवले त्यामुळे पोलिसांनी खा.बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.