Bjp Kisan Morcha -भाजप किसान मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी वासुदेव काळे



|सहकारनामा|

मुंबई :  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या प्रदेश अध्यक्षपदी दौंड चे वासुदेव(नाना) काळे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वासुदेव काळे यांची भाजप किसान मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

यापुर्वी मा.कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी हि जबाबदारी संभाळलेली होती. प्रदिर्घ अनुभव धडाडीचे नेतृत्व, महाविद्यालय शिक्षणानंतर राजकारणात आलेले वासुदेव काळे सुरूवातीपासुनच भाजपात कार्यरत असुन कृतीशिल धडाडीचे नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. दोनवेळा पुणे जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या काळेंनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ही काम केलेले आहे तसेच दौंड विधानसभेची दोन वेळा निवडणुक लढविली आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीचे सलग ४ निवडणुकांचे प्रमुख म्हणून जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणारे काळे हे पक्षात पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष, महा.प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष, महा.किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस तसेच गेले अनेक वर्ष प्रदेश पातळीवरील संघटनात्मक विविध जबाबदाऱ्या प्रमाणिक पणे निष्ठेने पार पाडलेल्या आहे.

श्री.काळे हे गेली आठ वर्षापासुन जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातुन केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहचवित असतानाच मोफत माती परीक्षण, नवीन

पिक पध्दती, नवनविन विकसीत कृषी तंत्रज्ञान, शेती पुरक व्यवसाय, पशु संवर्धन अश्या अनेक विषायांवर अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आठ वर्षात पुर्वी सुरू केलेला कृषीक्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याला “कृषी मित्र” म्हणून पुरस्कार किसान मोर्चाच्या वतीने प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे.

पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प व धरणग्रस्त संघटनेच्या माध्यमातुन उजनी धरणग्रस्तांसह विविध प्रकल्पांमधील बाधित व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने आक्रमक पध्दतीने काम करणारे काळे विरोधी पक्षात काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी अतिशय आक्रमक आंदोलने, उपोषणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आसणारे काळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड केल्याने सर्व स्तरातुन आनंद व्यक्त होत आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही त्यांना या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.