Categories: राजकीय

आगामी निवडणुकांसाठी ‛भाजप’ ने कंबर कसली, भाजप ची ‛बूथ बैठक’ संपन्न

दौंड : आगामी निवडणुकांसाठी भाजप ने संपूर्ण राज्यात युवा कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. एक प्रकारे येणाऱ्या निवडणुकांसाठी त्यांनी कंबर कसल्याचे पहायला मिळत असून भाजप सेल च्या विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात असून यातून मोदी @ ९ महासंपर्क अभियाना अंतर्गत बैठका पार पडत आहेत.

मोदी @ ९ महासंपर्क अभियानाअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा बूथ, सबसे मजबूत कार्यक्रमाद्वारे भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील १० लाख बूथ प्रमुखांशी भोपाळ येथून व्हर्च्युअल रॅली द्वारे संवाद साधला. यावेळी दौंड विधानसभा मतदार संघातील भाजपा बूथ प्रमुख, शक्त्ती केंद्र प्रमुख हे बोरमलनाथ मंदिर, चौफुला येथून या कार्यक्रमामध्ये लाईव्ह सहभागी झाले होते.

यावेळी दौंड ग्रामीण मंडलातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आदींसह भाजप आमदार राहुल कुल, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा सौ. कांचन कुल, भाजप तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, दौंड विधानसभा निवडणूक प्रमुख हरिभाऊ ठोंबरे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, धनाजी शेळके, मोहन म्हेत्रे, उमेश देवकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बापूराव भागवत हे उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी दौंड विधानसभा मतदारसंघातील सोशल मिडिया इन्फ्लुएंसरची बैठक पार पडली या बैठकीत आमदार राहुल कुल यांनी उपस्थित युवा सहकाऱ्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजना, विकासकामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला दौंड तालुक्यातील सोशल मीडिया सेल चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आमदार कुल यांसह भाजपा प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा सौ. कांचन कुल, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष संदेश धायगुडे यांसह सोशल मिडिया सेल चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

8 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago