दौंड : आमदार राहुल कूल व ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते व क्रिश्चन समाजाचे युवा नेतृत्व राजू जाधव यांचा वाढदिवस विविध पक्ष्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात साजरा केला. कटारिया यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी नुकताच साजरा केला.
ज्या कार्यकर्त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला त्यांचा वाढदिवस ही कटारिया तितक्याच उत्साहात साजरा करतात. त्यांच्या या परंपरेप्रमाणे कटारिया यांनी आपल्या कार्यालयात राजू जाधव याचा वाढदिवस शाल, पुष्पगुच्छ देत साजरा केला व राजुला पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.नगराध्यक्ष योगेश कटारिया, नगरसेवक बबलू कांबळे, गोविंदबाबू अग्रवाल,अमोल सोनवणे, रियाज पटेल आदी उपस्थित होते.
राजू जाधव हे सर्वांशीच मन मिळावूपणे वागत असल्याने सर्वच राजकीय गटाशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बादशहा शेख, उपनगराध्यक्ष विलास शितोळे, नगरसेवक गौतम साळवे यांनी सुद्धा राजू जाधव याचा वाढदिवस नगरपालिका कार्यालयात साजरा करीत त्याला शुभेच्छा दिल्या.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष सतीश थोरात, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शैलेंद्र पवार, हिंदू एकता मंच दहीहंडी उत्सव समितीचे मुख्य आयोजक रुपेश कटारिया, वीरधवल जगदाळे युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष उमेश जगदाळे, मा. उपनगराध्यक्ष अनिल सोनवणे, ऍड. अमोल काळे व मित्र परिवाराने राजू जाधव याचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यास पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.