दौंड : दौंड तालुक्यामध्ये सध्या दरोडे आणि घरफोडयांना उधाण आले आहे. चोरटे रात्रीच्या चोऱ्या करता करता आता दिवसाढवळ्या सुद्धा चोऱ्या करू लागले आहेत त्यामुळे नागरिकांनी आता सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.
दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान शंकर भीमशा शिवशरण यांच्या फ्लॅटमध्ये असाच काहीसा घरफोडीचा प्रकार घडला असून या घरफोडीमध्ये सुमारे 3 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
फिर्यादी हे त्यांचं भाच्याकडे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील १७,०००/- किंमतीची सोन्याचे
झुमके (अर्धा तोळे) वजनाचे २) १,०५,०००/किंमतीची सोन्याचा गंठण (तीन तोळे) ३)
१,४०,०००/- किंमतीची गंठण पुर्ण सोन्याचे (४ तोळे) ४)१७,०००/- किंमतीची सोन्याचे
कानातील वेल (५ ग्रॅम) ५) १२,०००/- किंमतीचे सोन्याचे पेंडल (३ ग्रॅम) ६) १७,०००/- किंमतीची सोन्याचे झुमके
झुमके (अर्धा तोळे) आणि १४,०००/- रोख रक्कम असा एकुण ३ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे, अधिक तपास पो हवा लोंढे करीत आहेत.