Categories: क्राईम

खाजगी कुरिअरवाल्याची 24 लाख 32 हजार रुपयांची बॅग लूटली, ‘यवत’ मधील धक्कादायक घटना

पुणे : दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीमध्ये पुणे–सोलापुर हायवे रोडवर इंदापुर – स्वारगेट बस नं एम एच १३ / सी यु ७२४६ मध्ये दोन अज्ञात इसमांनी एका प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे 24 लाख 32 हजार रूपये लुटून नेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रज्योत रमेश शिंदे (व्यवसाय खाजगी कुरिअर सर्व्हिस) हे वरील बसमधून प्रवास करत असताना त्यांच्याजवळ काही तीन आले त्यामध्ये अंगात काळे रंगाचे जर्किंग
घातलेल्या इसमाने फिर्यादीला, तु मुलींची छेड काढतो काय, असे म्हणुन हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहान सुरू करून त्यातील अन्य अनोळखी इसमाने फिर्यादीने पकडलेल्या पार्सल बॅगवरील हातावर लाथा मारून जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील पैसे असणारे पार्सल हीसकावुन घेवुन बसमधुन उतरून पळुन गेले.

ही घटना दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवरील यवत गावाजवळ घडली. संबंधित इसमाला मारहाण होत असताना कुणीच मध्ये पडले नाही किंवा बॅग हिसकावून घेऊन जात असताना आरोपिंना कुणी रोखले नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वरील पार्सलमधील रक्कमेचे हीशोब करून मालक प्रशांत काटे हे मुंबईवरून आलेनंतर त्याांचेमार्फत खातजमा करून फिर्यादी यांनी चोरी प्रकरणाशी संबंधित तीन अनोळखी इसमांविरूद्ध यवत पोलीस ठाण्यात कायदेशिर तक्रार दिली आहे. या लुटीमध्ये एकूण २४ लाख ३२ हजार ५७० रूपये चोरून नेण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोसई मदने करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago