यवत पोलिसांची वरवंडमध्ये मोठी कारवाई, ३३ लाख ८५ हजार किंमतीचा गुटखा, मुद्देमाल जप्त

वरवंड (दौंड) : यवत पोलिसांनी वरवंडमध्ये गुटखा व्यापाऱ्यावर मोठी कारवाई करत ३३ लाख ८५ हजार किंमतीचा गुटखा, मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ०८/०२/२०२५ रोजी रात्री १०:०० च्या सुमारास वरवंड ता. दौंड जि. पुणे गावच्या हद्दीत महाराष्ट्र शासनाचे वतीने मा. अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये प्रतिबंधीत केलेल्या व मानवी जीवीतास अपायकारक असलेल्या प्रतिबंधीत गुटखा पान मसाला, सुगंधी तंबाखू साठयाची विक्री करण्याचे हेतूने बेकायदेशीरपणे अवैधरित्या वाहतूक करित असल्याची गोपनीय बातमी यवत पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई केली.

यावेळी अल्ताफ गुलाब शेख यांच्या जागेत दोन अनोळखी चालक हे त्यांच्या ताब्यातील एक मारुती कंपनीची कॅरी गाडी व एक अशोक लेलंड कंपनीचा बडा दोस्त चारचाकी पिकअप या वाहनांमध्ये मानवी शरीरास अपायकारक असणारा व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखुची असा वाहनांसह एकुण किंमत ३३ लाख ८५ हजार ५६० रुपयांच्या मालासह सदर ठिकाणी सोडून पळून गेले. म्हणुनसदरच्या वाहनांचे दोन अनोळखी पुरूष चालक व जागा तसेच वाहन मालक अल्ताफ गुलाब शेखयांचे विरोधात भा.न्या. सं. २०२३ कलम १२३, २२३,३(५) सह कलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम२००६ व नियमन २०११चे कलम २६ (२), २६ (२) (a), २७ (३) (d), २७ (३) (e), ५९ प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. पंकज देशमुख (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), मा. श्री. गणेश बिराजदार (अपर पोलीस अधिक्षक बारामती), मा. श्री. बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक किशोरवागज, सफौ फणसे, सफौ संजय देवकाते, पो.हवा. नारायण वलेकर, पो. हवा. संदीप देवकर, पो.हवा. दत्ता काळे, पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. पानसरे, पो. हवा . प्रमोद गायकवाड, पो.हवा.संतोष खरटमल, पो.हवा. विजय आवाळे, पो. कॉ. मारूती बाराते, पो. कॉ. किरण तुपे, पो. कॉ. प्रणव ननवरे, पो. कॉ. मोहन भानवसे यांचे पथकाने केली आहे.