Categories: Previos News

Big News : तालुक्यातील वाळू माफियांचे कंबरडे मोडणार ! आमदार कुल यांची तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा



पुणे : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेत तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी आमदार कुल यांनी काही मागण्या केल्या आहेत.

आमदार राहुल कुल यांनी केलेल्या मागण्यांमध्ये पहिली महत्वाची मागणी ही होती की, गेले ६ महिने रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे व कामानिमित्त दौंड – पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर, अत्यावश्यक सेवेतील , शासकीय, निमशासकीय सेवेतील इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना देखील दौंड-पुणे प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी हि महत्वपूर्ण मागणी होती.

यापूर्वीही  हि मागणी तत्कालीन  जिल्हाधीकारी नवल किशोर राम यांना देखील भेटून केली होती, परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही याची माहिती दिली. 

तसेच दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत आहे तेव्हा महसूल विभागाने कार्यवाही करून अवैध वाळू उपशाला लगाम घालावा यासोबतच काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या असून यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

5 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago