मुंबई : सहकारनामा
राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा सुरू झाला असून कोरोनाला रोखण्यासाठी आता संपूर्ण राज्यात रात्रीची संचारबंदी रविवारपासून लागू होण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण हि प्रशासनाची डोकेदुखी बनली असून त्यासाठी आता कडक धोरण अमलात आणले जाणार आहे. त्यासाठी येत्या रविवारपासून रात्रीचे जमावबंदीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून केले जावेत असेही ते म्हणाले आहेत.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलताना आम्हाला लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही, मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता उपाययोजना केलेल्या आरोग्य सुविधा सुद्धा पडतात की काय अशी शक्यता वाटत आहे असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी बाहेरील देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट त्यावेळी त्या देशांनी पुन्हा दोन महिन्यांचे लॉकडाउन केले आणि आता कुठे पुन्हा त्यांची पूर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत असून आपला धोका वाढताना दिसत आहे, त्यामुळे धोका टळला नसून उलट तो जास्त वाढला आहे हे आता सर्वांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.