नागपूर : सहकारनामा ऑनलाईन
प्रशाकीय अधिकारी आणि बेजबाबदार पुढाऱ्यांना वठणीवर आणणारे नागपूर चे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनीच ट्विट करून माहिती दिली आहे.
तुकाराम मुंढे यांनी आपल्या ट्विट मध्ये “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र मला कोणतीही लक्षण नाहीत. अशी माहिती दिली आहे. पुढे लिहिताना त्यांनी आपण नक्की जिंकू असा विश्वासही ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.
तुकाराम मुंढे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी मात्र आपण नागपुर आणि परिसरातील कोरोना व्हायरस हा नियंत्रणात आणण्यासाठी घरातून काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे तसेच गेल्या 14 दिवसांमध्ये जे आपल्या संपर्कात आले असतील त्यांनीही स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आपल्या कोरोना आजाराबाबत माहिती देताना त्यांनी माझा कोरोना चाचणीचा अहवाल जरी पॉझिटिव्ह आला असला तरी माझ्यात कोणतीही लक्षण नाहीत, मात्र तरीही मी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.