Categories: Previos News

Big News : दौंड शहरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ‛या’ वेळेत “संचार बंदी” लागू



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत  संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे. 

बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल रात्री 10 वाजता बंद करावी लागणार आहेत, मात्र हॉटेल व्यवसायिकांना रात्री 11 वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. संचार बंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही दौंड पोलिसांनी केले आहे. 

शहर व परिसरात कोरोना चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे, रोजच बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाने या  परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोरोना पासून बचावा साठीच्या उपाय योजनांची नागरिकांनी जबाबदारीने अंमलबजावणी केली व वाढती कोरोना रुग्णांची संख्या घटली तरच शहरावरील निर्बंध हटविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाईल, रुग्ण संख्या वाढ थांबली नाही तर मात्र शहरात अधिक कठोर निर्बंधाचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाईल असे बोलले जात आहे. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी हे ध्येय समोर ठेवून शहरातील प्रत्येक नागरिकाने कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago