Big News – सौ. कांचन राहुल कुल यांची भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपने उमेदवार दिलेल्या सौ.कांचन राहुल कुल यांची पुणे जिल्हा भाजपच्या महिलाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट यांसह गणेश किसन भेगडे यांसह अनेक मान्यवर उपास्थित होते.

यावेळी कांचन कुल यांनी बोलताना कुल कुटुंबीयांवर भाजपाने दाखविलेल्या विश्वासाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

 दौंड चे आमदार राहुल कुल आणि कुटुंबीयांचा जनसंपर्क आणि पूर्वी केलेले काम याच्या आधारावर यापुढेही भाजपच्या माध्यमातून विविध प्रश्नी मार्गी लावणार आहे असं कांचन कुल यांनी स्पष्ट केलंय.

कांचन कुल यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती.